पुणे प्रतिनिधी : बालेवाडी येथील सर्वे नं 23 या ठिकाणी विनापरवाना रस्ते खोदाई करून विद्युत केबल 350 मी टाकण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत कोणत्याही ठिकाणी विनापरवाना रस्ते खोदाई करून बालेवाडी येथील मालपाणी इस्टेट या बांधकाम व्यावसायिकाने विनापरवाना खोदाई केल्यामुळे त्यास आकारलेला 1,28,01,600₹ दंडाची नोटीस 27/12/2023 रोजी पाठवण्यात आली होती तो दंड आज एक वर्ष उलटून गेले तरी बांधकाम व्यावसायिकाने दंड मनपा कोषागारात भरला नाही.
पुणे मनपाने व्यावसायिकास पुन्हा एकदा नोटीस देऊन दंड व्याजासहित वसूल करावा. अन्यथा या व्यावसायिकाचे शहरात चालू असणाऱ्या मालपाणी यांच्या इतर बांधकामांना Work Stop Notice द्यावी.या बांधकाम व्यावसायिकाची कृती ही मनपा स्ट्रेचिंग पाॅलिसी भंग करणारी आहे.या व्यावसायिकाने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यामुळे दंड वसुल करावा अन्यथा आम्ही येत्या काही दिवसांत न्यायालयाचा मार्ग अवलंबवू असा इशारा रयत विद्यार्थी परिषदेचे ऋषिकेश कानवटे यांनी दिला.