बाणेर: म्हाळुंगे येथे झालेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेतील क्षतिग्रस्त कुटुंबांना बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक आणि शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांच्या वतीने एक महिन्याचे किराणा साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे नेते बाळासाहेब भांडे, राम गायकवाड, ओम बांगर, रखमाजी पाडाळे, किरण मुरकुटे, अविनाश गायकवाड, शिवकुमार नाईकवाडे उपस्थित होते.
डॉ दिलीप मुरकुटे म्हणाले, “म्हाळुंगे येथील आग दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. या कठीण काळात आपण सर्वांनी एकत्र येऊन पीडित कुटुंबांना मदत करणे आवश्यक आहे. माणुसकीच्या नात्याने, मी माझ्या परीने या कुटुंबांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजातील इतर दानशूर व्यक्तींनीही या कुटुंबांना मदतीसाठी पुढे यावे.”
