पुणे : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने संपूर्ण वारी दरम्यान “महाआरोग्य शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी दिली.
देहू पासून पंढरपूर कडे जाणाऱ्या वारी मार्गावरती सर्व वारकऱ्यांची सेवा या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी औषध वाटप थेरपी आरोग्य सल्ला वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दिनांक 10 ते 29 तारखेपर्यंत महाआरोग्य शिबिर वारकऱ्यांसाठी सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असून आकाश झांबरे पाटील डॉक्टर किरण थोरात डॉक्टर सहर्ष घोलप मुख्य समन्वयक म्हणून तर जिल्हा समन्वयक म्हणून करण कोकणे, विक्रम जाधव, यश साने, सागर पडघळ काम पाहणार आहेत.