संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून तीव्र निषेध

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने संभाजी भिडे यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त व आक्षेपार्ह विधानांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. कृषीमंत्री ते संरक्षणमंत्री अशी देशपातळीवरील महत्त्वाची पदे भूषवलेल्या व्यक्तीला ‘देशद्रोही’ ठरवण्याचे धाडस संभाजी भिडे कशाच्या आधारे करतात, असा सवाल यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला.

देशासाठी आयुष्य वाहिलेल्या शरदचंद्र पवार यांच्याविरोधात अशा प्रकारची विधाने करणे हे केवळ राजकीय द्वेषातून प्रेरित असून, संभाजी भिडेंची ही कृती त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचेच द्योतक असल्याचे आंदोलकांनी सांगितले. तसेच सतत वादग्रस्त विधाने करणे, आई-बहिणींच्या पेहरावावर बोलणे यासारख्या वक्तव्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचा आरोपही करण्यात आला.

संभाजी भिडे यांनी देशासाठी नेमके कोणते ठोस कार्य केले आहे, असा सवाल उपस्थित करत पवार साहेबांसारख्या पदविभूषित आणि अनुभवी नेत्याबद्दल बोलण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे आंदोलकांनी ठामपणे नमूद केले. विशेष म्हणजे अशा व्यक्तीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मोदी सो.’ हा किताब बहाल करण्यात आल्याची बाबही यावेळी आंदोलकांनी निदर्शनास आणून दिली.

या सर्व पार्श्वभूमीवर संभाजी भिडे यांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मा. अध्यक्ष श्रीकांत पाटील, मा. विशाल ताबे, मा. उदय महाले, मा. स्वाती ताई पोकळे, मा. भगवान सांळुके, डॉ. सुनील जगताप, मा. किशोर काबळे, मा. औदुंबर खुने, मा. श्रद्धा ताई कुदळे, मा. हेमंत येवलेकर, मा. रोहन पायगुडे यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे