आपल्या सर्वांना आजच्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!.
हा महिला दिन नेमका सुरू का झाला माहित आहे ? आणि तोही नेमका 8 मार्चला कशासाठी? चला आपण बघूयात नेमका हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा का केला जातो.आपल्या सगळ्यांना माहित असेलच की, देश कोणताही असो प्रत्येक वेळेस, प्रत्येक ठिकाणी महिलांना आपला हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. झगडावं लागलं. 1908 मध्ये सुद्धा सुमारे 15000 महिलांनी एक मोठा मोर्चा काढला होता आणि या मोर्चाचे ठिकाण होतं न्यूयॉर्क सिटी. खरंतर हा मोर्चा त्यांनी काही मागण्यांसाठी काढला होता. त्यामध्ये त्यांचे कामाचे तास कमी केले जावेत, त्यांचे वेतन वाढवण्यात यावे , या आणि अशा मागण्यां व्यतिरिक्त त्यांनी आणखीन एक मागणी केली होती ती म्हणजे महिलांना सुद्धा मतांचा अधिकार दिला जावा. या ठिकाणी आपल्याला अभिमानाने सांगावसं वाटतं की आपल्या संविधानाने मात्र महिलांना कोणताही प्रकारचा संघर्ष करण्याची गरज भासूच दिलेली नाही. कारण संविधानानेच महिलांना मताचा अधिकार दिलेला आहे. आणि प्रत्येक मताचे मूल्य हे समान ठेवलेला आहे.
चला आपण पुन्हा एकदा महिला दिनाकडे जाऊया मग अशा रीतीने प्रत्येक ठिकाणी संघर्ष होत होता. महिला आपल्या हक्कांसाठी झगडत होत्या आणि अशाच परिस्थितीमध्ये 1910 मध्ये कोपनहेगांमध्ये आंतरराष्ट्रीय वर्किंग वुमन ची परिषद भरली होती.या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सुमारे 17 देशांच्या 100 महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. याच कॉन्फरन्स मध्ये असं सुचवलं गेलं की वर्षा मधला एक दिवस हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून आपण साजरा करूयात. त्यांच्या या प्रस्तावाला सगळ्याच बाकीच्या महिला सदस्यांनी एकमुखाने मान्यता दिली आणि तो प्रस्ताव स्वीकारला. परंतु तरीसुद्धा प्रत्यक्षात मात्र आंतरराष्ट्रीय महिला दिवस सुरू होण्याची कार्यालयीन सुरुवात 1975 मध्ये झाली कारण 1975 मध्ये युनोने स्वतः सांगितलं की 8 मार्च हा दिन जगभर जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जाईल. आणि तेव्हापासून ते आजतागायतपर्यंत आपण ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करत आहोत. युनोने त्याचसोबत 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर केलं होतं. दरवर्षी 1996 पासून ह्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक विशेष संकल्पना स्वीकारण्याची कल्पना पुढे आली आहे. यावर्षीची संकल्पना आहे ‘महिला सशक्तीकरण आणि सबलीकरण’.
युनो ने असं सांगितलं आहे की या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे तीन रंग मानले जावेत. पहिला रंग जांभळा. हा रंग न्याय आणि प्रतिष्ठेचा प्रतिक आहे. दुसरा रंग आहे हिरवा, जो आशेचे प्रतीक आहे. आणि तिसरा रंग आहे पांढरा, जो पावित्र्याचा प्रतीक आहे.
परंतु आजची परिस्थिती पाहता, आज अनेक वर्षानंतर देखील
हा आठ मार्च नेमका आहे तरी काय? हा 8 मार्च नेमका जागतिक महिला दिन म्हणून का साजरा केला जातो. फक्त एकच दिवस महिलांच्या स्वातंत्र्यासाठी किंवा महिलांच्या कर्तुत्वाचा गुणगौरव करण्यासाठी हा महिला दीन म्हणून साजरा केला जातो का ? असे प्रश्न आपल्याला पडल्यावाचून राहणार नाहीत.
किती खंताची बाब आहे ना ही की वर्षातल्या 365 दिवसांपैकी फक्त एक दिवसच आम्ही महिलांचा कर्तुत्वाचे गुणगान गात असतो. महिलांच्या दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून फक्त एक दिवसच त्यांना आम्ही मुक्त करतो .फक्त एकच दिवस त्याच्यासाठी देत असतो. खरंच मुक्ततेसाठी देतो का त्यांना हा दिवस? अलीकडे अगदी महिला दिनाला असं वाटतं की महिला दिनाला बैलपोळ्याच्या सणासारख झालंय की काय ? शेतकरी बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला आंघोळ घालतो. त्याला धुतो. त्याला खाऊ पिऊ घालतो त्याच्या अंगावरती झुल पांघरतो.त्याला अगदी वाजवत गाजवत साऱ्या गावातून मिरवतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचा कसलाही विचार न करता त्याला पुन्हा कामाला जुंपतो. त्याला पुन्हा राब राबवून घेतो.कष्टाची कामे करून घेतो.आज तसच काहीसं झालंय महिला दिनाचं.अगदी बैल पोळ्यासारख. फक्त एकच दिवस कौतुक करायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिच्याकडून काम करवून घ्यायचं. असाच प्रत्येक स्त्रीचं आयुष्य आहे का?
खरंतर कर्तुत्ववान स्रियांचा आयुष्य हे इतका छोट आहे का ? असं म्हटलं जातं की कर्तुत्वान पुरुषांचा पगार कधी विचारू नये आणि स्त्रीचं वय कधी विचारू नये कारण प्रत्येक स्त्री ही स्वतःसाठी जगत नसते तर ती जगत असते दुसऱ्यांसाठी. ती जगते समाजासाठी. ती जगते घरच्यांसाठी. ती जगते मुलांसाठी बाळांसाठी. ती व्यक्ती आपल्या घरातल्या हरेएकासाठी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कस्थ करत असते.तिच्या हाताला आराम नसतो. अष्टभुजा म्हणणाऱ्या देवीची पूजा आपण करतो पण खरंतर अष्टभुजा नारी ही आपल्या घरातच आहे. अष्टभुजा म्हणून आपण देवघरातल्या लक्षीची पूजा करतो परंतु अष्टभुजा म्हणून घरातल्या देवीची पूजा करतो का?
खरंच 21 व्या शतकामध्ये महिला सबला झाल्या आहेत काय? सरकार महिला सबलीकरणाचे काम करतं. सरकार महिला सबलीकरणाचे काम करते. महिला सबलीकरण करण्यासाठी अनेक कार्यक्रम योजले जातात. एकीकडे स्त्रीभ्रूणहत्या म्हणून कार्यक्रम घेतले जातात तर दुसरीकडे त्याच महिलांवर बलात्कार घडवून आणले जातात. ते अगदी छोट्या मुलींपासून तर ते म्हाताऱ्या महिलांपर्यंत बलात्कार होताना दिसतात.मग आपण कुठून म्हणतो की महिला सुरक्षित आहेत. महिलांना त्यांचे हक्क मिळालेत. कदाचित मिळाले ही असतील. स्त्रियांना त्यांचे स्वातंत्र्य मिळालेही असेल. कायद्याने घराच्या बाहेर त्यांना त्यांच्या हक्क मिळालेत परंतु घराच्या आत त्यांना स्वातंत्र्य मिळाला आहे का? या पुरुषप्रधान संस्कृतीने आजही त्यांना घरामध्ये उंच आवाज करून बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे काय?
कुठल्या विषय असू द्या, कुठल्या कार्यक्रमासू द्या, कुठल्या कार्यक्रमाचे नियोजन असू द्या तिला कधीच प्रथम स्थान दिले जात नाही. तिला तिच मत विचारले जात नाही की तुला काय वाटतं? तिलाही वाटत असेल की तिलाही तुमच्या मध्ये मिळून घ्याव आणि माणूस म्हणून जगू द्यावं. तिला वाटत नाही की, त्यांनी रोज तिची पूजा करावी पण कधीतरी किमान एकदा तरी तिचा गुणगौरव करावा. पण आज आपलं नेमकं चुकतंय काय? सरकारनं स्त्रियांसाठी खूप काही केलं आहे तरी देखील स्त्रिया आज मागे पडताना दिसत आहेत, कुठेतरी कमी पडत आहेत. त्यांना त्यांचा स्वाभिमान डगमगताना दिसत आहे कारण हा समाज त्यांना स्वाभिमानाने जगू देत नाही. जेव्हा स्त्रियांमधला स्वाभिमान जागा होईल तेव्हा त्या कर्तुत्वाची आणखीन उंच शिखरे गाठल्याशिवाय राहणार नाहीत. जोपर्यंत स्त्रिया खऱ्या अर्थाने म्हणत नाहीत की कितीही संकटे येऊ देत मी स्वतः सामोरे जाणार आणि मात करणार. आज बऱ्याच मुली तक्रार करताना दिसतात की ही मुलं आम्हाला येवून त्रास देतात. येता जाता रस्त्यात छेडतात. पण या सर्व मुलींनी आपाल्यातली दुर्गा जागी करायला हवी. आपल्यातली कालिका जागी करायला हवी. जोपर्यंत तुम्ही इंग्रजांविरुद्ध लढलेल्या झाशीच्या राणीला आठवू शकत नाहीत. जोपर्यंत तुम्ही स्वतःचा स्वाभिमान जागा केला नाहीत, जोपर्यंत तुम्ही स्वतःच कणखर झाला नाहीत तर नक्कीच अशा गोष्टींना आळा बसेल.
आजच्या दिवशी ते बळ आपल्या आजूबाजूच्या सर्व भगिनींना मिळो ह्याच ह्या दिवशीच्या त्यांना शुभेच्छा !
–प्रा.बी.आर.घोडके.
पुणे.
(मोबाईल नं.9923848177).