बाणेर आशापुरी डायनिंग हॉल शेजारील लेनमधील कचरा उचलण्याबाबत व टाकणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईची मनसेची मागणी

बाणेर : बाणेर रस्त्यावरील यशदा बिझनेस झोन समोरील लेनमध्ये व आशापुरी डायनिंग हॉल शेजारील लेनमध्ये आसपासचे नागरिक, येणारे जाणारे नागरिक, हॉटेल चालक  मोठ्याप्रमाणावर खराब झालेले अन्न व कचरा टाकतात. आतील बाजूस मोठी नागरी वस्ती असल्याने नागरिकांना येथून चालत जावे लागते. या परिसरात अनेक प्रकारची अन्नपदार्थ विक्रीची दुकानेही येथे आहेत. तो कचरा  रस्त्यावरच पसरत असल्याने रस्ता अरुंद होत आहे नागरिकांना सदर ठिकाणाहून चालणेही कसरतीचे झाले आहे. यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे.


सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने व त्यातच इथे कचरा टाकल्यामुळे एकप्रकारे रोगराईस आमंत्रणच मिळाले आहे. परिसरात कचऱ्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते व डासांचाही प्रादुर्भाव हि मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. डेंगीच्या मच्छरांची पैदास होऊन नागरिकांना डेंग्यूची लागण होण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर या परिसरातील काही रहिवाशी थंडी तापाने त्रस्त झाले आहे.

आशापुरी डायनिंग हॉल शेजारील भिंतीजवळील कचरा उचलावा व टाकणाऱ्या नागरिकांवर प्रतिबंधात्मक व दंडात्मक कारवाई करावी. जर येत्या २ दिवसांमध्ये कचरा उचलला नाही तर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल. याची आपण नोंद घ्यावी अश्याप्रकाचे निवेदन  महापालिका सहाय्यक आयुक्त, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय,औंध, पुणे यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, उपविभाग अध्यक्ष पांडुरंग सुतार, प्रभाग सचिव संदीप काळे व कार्यकर्ते उपस्थित होते.

                                                           

See also  सुसगाव येथील व्हीबग्युअर स्कूल ते सनी वर्ल्ड रस्त्यावरील बंद पथदिवे सुरू करण्यात यावेत