औंध परिसरामध्ये कारवाईनंतरही रस्त्यांवर आठवडे बाजार सुरूच; मनपा आयुक्तांनीच अतिक्रमण विभागाचा चार्जिंग घ्यावा नागरिकांची मागणी

औंध : औंध येथील नगरस्रस्ता व डीपी रोड परिसरामध्ये अनाधिकृत आठवडे बाजार भरवले जात आहेत. पुणे महानगरपालिकेच्या अरुंद मुख्य रस्त्यांवर देखील आठवडे बाजार सुरू असून पुणे महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यांवर भरवण्यात येणाऱ्या आठवडे बाजारांना परवानगी नसताना देखील अतिक्रमण विभागाच्या कारवायांना दाद न देता रस्त्यांवरच आठवडे बाजार भरवले जात असल्याने माननीय आयुक्तांनीच अतिक्रमण विभागाचा कार्यभार आपल्या हातात घ्यावा अशी मागणी नाईलाजाने केली जात आहे.

औंध परिसरामध्ये अनधिकृत आठवडे बाजार कारवाईनंतरही सुरूच असल्याने रस्त्यावर वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने अतिक्रमण कारवाई करण्यात येत असली तरी ही कारवाई काही ठराविक ठिकाणीच होत असल्याने रस्त्यांवर भरणारे आठवडे बाजार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

राजकीय दबावापोटी अनधिकृत आठवडे बाजारांवर योग्य कारवाई होत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडी समस्या निर्माण होत असताना देखील पुणे महानगरपालिका अथवा वाहतूक पोलिसांच्या वतीने योग्य कारवाई केली जात नाही. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. रस्त्यांवर आठवडे बाजार भरवणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच आठवडे बाजारामध्ये फोटो लावलेल्या राजकीय कार्यकर्त्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

See also  डॉ.कैलास कदम यांची इंटक च्या प्रदेशाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जाहीर नागरी सत्कार