पुणे : देशाची ढासाळलेली अर्थव्यवस्था,महागाई, बेरोजगारी,राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवत पुरोगामी महाराष्ट्राच्या सुशासनाची लक्तरे वेशीवर टांगणारे सत्ताधारी,वाहतूक कोंडी,शेतकरी कर्जमाफी, ड्रग्स माफिया,लाडक्या बहिणींची फसवणूक,पुण्यनगरीत घडत असलेल्या गुन्हेगारी,महिला अत्याचार, स्वारगेट सारख्या बलात्काराच्या घटना या सगळ्यांना कारणीभूत असलेल्या महायुती सरकारच्या कारभाराची पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने “प्रतिकात्मक होळी” पेटवून निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी पुणे शहराचे अध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप, पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर व कोरटकर यांच्या प्रतिमेचे देखील दहन करण्यात आले.