‘धोरण कुठवर आलं ग बाई’ (राज्य महिला धोरण : तीन दशकांचा आढावा) या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित यशस्विनी सन्मान सोहळ्याचे औचित्य साधून आदरणीय पवार साहेब आणि माजी खासदार पद्मश्री अनु आगा यांच्या शुभहस्ते ‘धोरण कुठवर आलं ग बाई’ (राज्य महिला धोरण : तीन दशकांचा आढावा) या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे करण्यात आले.

शरद पवार साहेब यांच्या दुरदृष्टीमुळे महिलांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर  करून त्याची योग्य व यशस्वी अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले होते. त्या ऐतिहासिक निर्णयास यंदा ३० वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने महिलाच्या धोरणाचा इतिहास, प्रवास, फायदा, परिणाम अशा विविध बाबींचा अभ्यासात्मक आढावा घेण्यासाठी पत्रकार संध्या नरे-पवार संपादित ‘धोरण कुठवर आलं ग बाई’ हे पुस्तक सकाळ प्रकाशन यांनी प्रकाशित केले आहे.

३७५ पानी या पुस्तकात जवळपास २० लेखांचा समावेश आहे. त्यातून १९९४ ते २०२४ पर्यंतचा पट उलगडला आहे. तसेच गेल्या तीन दशकात महिला धोरणांमुळे एकूण स्त्री जीवनात नेमके काय बदल झाले? अपेक्षित अंमलबजावणी झाली का? त्यात कोणत्या त्रुटी राहिल्यात का? त्या धोरणात वर्तमान पिढीतील तरुण मुलींच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब उमटले आहे का? अशा विविध मुद्द्यांचा सविस्तर ऊहापोह करण्यात आला आहे.

त्यामुळे स्त्रियांचे प्रश्न, जीवन, आजपर्यंतची वाटचाल, महिला धोरणे आणि प्रशासकीय अंमलबजावणी याचा संदर्भासह आढावा घेण्यासाठी हे पुस्तक म्हणजे अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक दस्तावेज ठरत आहे.

See also  पीआयसीटीमध्ये आंतरमहाविद्यालयीन क्रीडास्पर्धांचा जल्लोषात प्रारंभ