स्नेहांकुर द रे होप या सामाजिक संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लेखन साहित्य वह्या वाटप

पुणे : स्नेहांकुर द रे होप या सामाजिक संस्थेच्या वतीने वाल्हे केंद्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा व वाघेश्वरी हायस्कूल पिंगोरी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लेखन साहित्य वह्या वाटप करण्यात आले.

प्राथमिक शाळांतील  एकूण 500 मुलांना प्रत्येकी तीन थ्री इन वन च्या 3-3वह्या व पेन्सिल, लेखन साहित्याचा 1बॉक्स तसेच वाघेश्वरी हायस्कूल पिंगोरी येथील 100  मुलांना प्रत्येकी 3 फुलस्केप वह्या  व 1कंपास बॉक्स असे साहित्य वाटप करण्यात आले.

या प्रसंगी वाल्हे केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री धनाजी नाझीरकर साहेब, स्नेहांकुर परिवाराचे एडव्होकेट वृषाली दातार मॅडम, श्री विवेक साने, श्री श्रीपाद काळे, श्री मोहन बागमर, श्री अभिजीत दातार, श्री मनोज वाघमारे, श्री अजित केदारी, पूर्वा गदो. तसेच वाल्हे केंद्रातील सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, पिंगोरी हायस्कूलचे  सर्व शिक्षक  व विद्यार्थी उपस्थित होते.

See also  वृक्षारोपण संकल्पाची यशस्वी सुरुवात पहिल्या टप्प्यात कोथरुड मध्ये ६५०० वृक्षांची लागवड