स्वारगेट : बलात्कारी, अत्याचारी प्रवृत्ती आणि जातीयवादाच्या विरोधात होळी वंदे मातरम संघटनेच्या वतीने करण्यात आली.
वंदे मातरम संघटनेच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून जात, धर्म, पंथ भेदभाव न करता भारतीय एकात्मतेची होळी साजरी केली जाते.
स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमधील अमानुष घटनेच्या निषेधार्थ आणि दत्ता गाडेला फाशी व संतोष देशमुख यांना न्याय मिळावा तसेच त्यांच्या हत्येतील वाल्मीक कराड व सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी. या मागण्यांसाठी होळी दहन करण्यात आले.
या आंदोलनात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, वंदे मातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे, पुणे शहर अध्यक्ष अमोल जगताप, कार्याध्यक्ष मोहित काकडे, समन्वयक महेश बाटले, आयटी सेल अध्यक्ष विशाल शिंदे तसेच राज घाटे, प्रसाद कुलकर्णी, ऋषभ देशपांडे, हेमंत कुंभार, किरण केकाने, आदित्य मुंगळे, आकाश जामगे, तुषार गिरी यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ही होळी महिलांच्या व शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते दहन करून समाजात सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला.
घर ताज्या बातम्या बलात्कारी, अत्याचारी प्रवृत्ती आणि जातीयवादाच्या विरोधात वंदे मातरम संघटनेच्या वतीने होळी























