पुणे : अमेझॉन या ऑनलाईन वेबसाईट द्वारे दहशतवादाचा अड्डा असलेल्या पाकिस्तान चा झेंडा ऑनलाईन विक्रीस उपलब्ध करून तमाम भारतीयांच्या भावनांना ठेच पोहचवण्याचं काम केलं आहे . त्याचाच निषेध म्हणून आज अमेझॉन या कंपनी चे पुण्यातील नवले पूल भागातील ऑफिस बाहेर पतित पावन ने जोरदार निदर्शने करत अमेझॉन कंपनीचे पोस्टर जाळत अमेझॉन वर बंदी घालण्याची मागणी केली .
“जगातील आघाडीच्या सेवा पुरविणाऱ्या अमेझॉन सारख्या कंपनी द्वारे अशी गोष्ट अपेक्षित नाही . या कंपनीचा सर्वात मोठा ग्राहक भारत देश असून अश्या पद्धतीने भारतीयत्वाला ठेच पोहचवण्याच काम करणाऱ्या अमेझॉन ला भारतीयांच्या रोषाला समोर जावं लागेल व त्यांना लवकरच भारतातून आपला गाषा गुंडाळावा लागेल अशी भावना यावेळी सीताराम खाडे यांनी व्यक्त केली “.
या प्रकरणात भारत सरकारच्या माहिती व प्रसारण विभाग तसेच वाणिज्य विभागा कडे भारतात अमेझॉन वर बंदी आणावी अशी मागणी पत्राद्वारे करणार आहोत असे जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे यांनी बोलताना सांगितले . या आंदोलनाचे नियोजन खडवकासला विभाग अध्यक्ष विजय क्षीरसागर आणि हवेली तालुका प्रमुख गणेश जाधव यांनी केले, यावेळी प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील ,प्रांत संपर्क प्रमुख राजेश भाऊ मोटे,गणेश कांबळे,अजय घारे,यादव पुजारी,अशोक परदेशी,राहुल शिंदे ,रामभाऊ जोरी,अनिल सातपुते , अजित पवळे , रोहन मोहोळ,बबलू थोरात,व इतर कार्यकर्ते उपस्तिथ होते.