छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी पाणी समस्येबाबतचे निवेदन ठेवत पुणे मनपाचा भाजपा कार्यकर्त्यांकडून निषेध

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजीनगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवजयंती निमित्त पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निवेदन ठेवून पुणे महानगरपालिकेच्या कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी पुणे शहर सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, पुणे शहर उपाध्यक्ष सुनील पांडे, पुणे शहर एस् सी आघाडी सरचिटणीस राजेश नायडू, शिवाजीनगर कार्यकारी अध्यक्ष शैलेश बडदे, शिवाजीनगर चे सरचिटणीस किरण ओरसे, प्रकाश सोलंकी, सचिन वाडेकर, युवा मोर्चा सरचिटणीस अपूर्व खाडे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजीनगर भागामध्ये गेल्या अनेक दिवस अपुरा पाणीपुरवठा होत आहे. गेले अनेक दिवस प्रशासनातील अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा कारवाई होत नाही. तसेच पुणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा प्रमुख नंदकिशोर जगताप  यांना या विषयात मागे निवेदन सुद्धा देण्यात आले होते. परंतु छत्रपती शिवाजीनगर मतदार संघामध्ये पाण्याची कुठल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही त्यामुळे आज पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला निवेदन देऊन महाराज आपणच आता यामध्ये बदल घडवू शकता. अशी अपेक्षा व्यक्त करत पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ प्रतीकात्मक आंदोलन करत महाराजांच्या पायाशी निवेदन ठेवण्यात आले. 

प्रशासनातील अधिकारी हे नागरिकांची सेवा करण्यापेक्षा ठेकेदारांची बिले कशी निघतील व ठेकेदारांचे हित कसे जोपासले जाईल यासाठी काम करत आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीला महाराज आपणच या विषयांमध्ये लक्ष घाला अशा आशयाने निवेदन पुणे महानगर पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पायाशी ठेवण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

See also  अधिक गतिमान, प्रशासनासाठी ‘टेक वारी’ उपक्रम मार्गदर्शक  – उपमुख्यमंत्री अजित पवार‘टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’चे उद्घाटन