नामदेवराव जाधव राजमाता जिजाऊ मॉं साहेबांचे तोतया वंशज,- रोहित पवार

पुणे : नामदेव जाधव नावाची व्यक्ती सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज म्हणवून घेत आहे, मात्र त्यांचा राजे लखोजीराव जाधव आणि जिजाऊ माँ साहेब यांच्या घराण्याशी कोणताही संबंध नसून ती व्यक्ती केवळ प्रसिद्धीसाठी पवार साहेबांवर टीका करत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) आमदार रोहीत पवार यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

रोहीत पवार म्हणाले आहे की, नामदेव जाधव नावाची व्यक्ती सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज म्हणवून घेत आहे. याबाबत चौकशी करून त्यांची तोतयेगिरी उघडकीस आणण्याची मागणी स्वराज्य संकल्पक महाराजा राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज प्रा. राजे गोपाल भगवानराव जाधव यांनी केली. याबाबतचं पत्र त्यांनी दिलं आहे. स्वतःच्या फायद्यासाठी कुणी असं करत असेल तर हे चुकीचं असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही रोहीत पवार यांनी केली आहे

मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात मराठा समाजाला शरद पवार यांच्या मुख्यमंत्री कालावधीतील 23 मार्च 1994 रोजीच्या जीआर मुळे आरक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याची टीका नामदेवराव जाधव यांनी केली होती. या दरम्यान राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्या वंशातील असल्याचे त्यांनी एका माध्यमाला मुलाखत देताना सांगितले होते. याबाबत आमदार रोहित पवार यांनी राजे गोपाल भगवानराव जाधव यांचे पत्र सोशल मीडियावर टाकत बोगस वंशाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

See also  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड आयटी सेल अध्यक्षपदी राहुल गोडसे यांची नियुक्ती