पुणे महानगरपालिकेत Ai प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे : राज्यशासनाच्या ‘१०० दिवसांचा कृती आराखडा’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा भाग म्हणून पुणे महानगरपालिकेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यावर आधारित विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ४ व ७ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या सदर कार्यशाळेला सर्व खाते प्रमुख, वर्ग १ आणि वर्ग २ चे अधिकारी, आरोग्य अधिकारी असे एकूण ३६७ अधिकारी उपस्थित होते.

Artificial Intelligence विषयात Ph.D आणि माहिती तंत्रज्ञानाचा प्रगल्भ अनुभव असणारे प्रशिक्षक श्री. डॉ. भूषण केळकर, श्री. डॉ. अमेय पांगारकर आणि डॉ. मधुरा केळकर यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना Ai चे प्रशिक्षण दिले. या तिन्ही प्रशिक्षकांनी AI चा वापर आणि गैरवापर यातील फरक समजावत AI ची उपयुक्तता अधोरेखित केली. विशेषतः AI चा स्वीकार (acceptance) करून त्यात प्रावीण्य (excellence) कसे मिळवता येईल, यावर त्यांनी विशेष प्रबोधन केले. प्रशिक्षकांच्या तज्ञ आणि अनुभवी दृष्टिकोनामुळे ही कार्यशाळा अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण ठरली.

सदर कार्यशाळेला उपस्थित अधिकाऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दर्शवला.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी बारामती मध्ये प्रचारादरम्यान केलेले भाषण जसेच्या तसे