छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शंभूराजे क्रिकेट क्लब विजेता

चांदे पुणे–  शंभूराजे क्रिकेट ग्राउंड चांदे येथे पार पडलेल्या छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी या क्रिकेट स्पर्धेचा उत्साहात आणि आनंदात समारोप झाला. या स्पर्धेमध्ये एकूण १० संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.एक महिन्यापासून सुरू असलेल्या आणि आज शेवटच्या अंतिम चुरशीच्या सामना स्पर्धेत शंभूराजे क्रिकेट क्लब नी विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली, तर लक्ष्य संघ उपविजेता ठरला. विविध खेळाडूंनी आपापल्या कौशल्यांचे प्रदर्शन करत अनेक खेळाडूंनी आपली उत्कृष्ट कामगिरी करताना पहायला मिळाली.

स्पर्धेतील विशेष पारितोषिक विजेते :
विजेता संघ: शंभूराजे क्रिकेट क्लब
उपविजेता : लक्ष्य टीम

मालिकावीर व उत्कृष्ट फलंदाज – पंकज चेमटे, उत्कृष्ट गोलंदाज – विशाल मांडेकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – विशाल लोंढे या सर्व विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात आले. स्पर्धेचे आयोजन श्री. आण्णासो पाटील (पाटील नगर, सूस) यांनी केले होते. त्यांच्या उत्कृष्ट संयोजनामुळे सर्व स्पर्धा सुरळीत पार पडल्या. स्पर्धे च्या नियोजनामध्ये श्री. अमृत कुलकर्णी सूस पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले .शेवटी आयोजकांनी सर्व सहभागी संघ, खेळाडू, प्रेक्षक व सर्व सहकारी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

See also  खडकवासला काँग्रेस कमिटीच्या वतीने राहुल गांधींसह ३०० खासदारांच्या अटकेचा व वोट चोरीचा निषेध व्यक्त करण्यात आला