पुणे : पुणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नाबाबत पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांशी तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत खासदार सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक विशाल तांबे, सचिन दोडके, खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक अण्णा मोकाशी, स्वाती पोकळे, सविता दगडे, अनिता इंगळे, आनंद मते, प्रदीप मरळ, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.