कात्रज : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजपा प्रभाग क्रमांक 28 व एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी देह झिजवणारे क्रांतीसुर्य थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त गंज पेठ पुणे येथील महात्मा फुले वाडा समता भूमीमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास एकता सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी पर्वती विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष गणेश शेरला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी सचिन खंडागळे, विशाल कुलकर्णी, गणेश तावडे, महेश साळुंखे, आदि यावेळी उपस्थित होते.
घर ताज्या बातम्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजपा प्रभाग क्रमांक 28 व एकता सेवा...