बालेवाडी : पुणे परिसरात राहत असलेल्या अल्प उत्पन्न गटातील नव विवाहित दांपत्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या.
बाणेर बालेवाडी म्हाळुंगे परिसरात राहत असलेल्या सामान्य कुटुंबाच्या मंगलकार्या निमित्ताने हा उपक्रम युवासेनेचे उपशहरप्रमुख युवा सरपंच मयुर भांडे यांनी राबवला. यावेळी शहरप्रमुख गजानन थरकुडे,यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले. शिवसहकार सेनेचे संपर्कप्रमुख बाळासाहेब भांडे ,जेष्ठ शिवसैनिक बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक दिलीप मुरकुटे, भारतीय कामगार सेना जिल्हा प्रमुख राम गायकवाड ,संकेत लोंढे, महेश भांडे, यश पाडाळे, अविनाश अंबुरे, आदेश भदर्गे, अशिष मोहिते संगीता बंडगुजर, पूजा गायकवाड, स्वाती लोंढे उपस्थितीत होते.
चि.सौ.का.अंजली पिंटू लोंढे या नववधूच्या व नातेवाईक यांच्याकडे संसार उपयोगी वस्तू सुपूर्द करण्यात आल्या.
घर ताज्या बातम्या नवविवाहित दांपत्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिला मदतीचा आधार