किल्ले सिंहगडावर विदेशी पर्यटकाबरोबर गैरवर्तन करणाऱ्या तरुणांवर कारवाई मागणी

खडकवासलाः किल्ले सिंहगडावर न्यूझीलंड वरून आलेल्या पर्यटकाबरोबर काही तरुणांनी गैरव्यवहार केल्याची व्हिडीओ क्लिप समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाली आहे.  तसेच या पर्यटकाला मराठी भाषेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत अश्लाघ्य शब्द बोलण्यास सांगितले. या तरुणांनी किल्ल्याचे पावित्र्य भंग केले आहे.या तरुणांना शोधून काढून त्यांचे वर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी. अशी  मागणी शिवसेना खडकवासला मतदार संघातर्फे हवेली पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. दरम्यान सदर तरुणांनी माफीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.

शुक्रवार (दि. 11 एप्रिल) सिंहगडाच्या पायवाटेने न्युझीलँड वरून आलेल्या पर्यटक ऐतिहासिक सिंहगडाचा  धगधगता इतिहास ऐकून गड सर करत होता. याचवेळी काही तरुण सिंहगडावर पर्यटनासाठी जात होते.  या तरुणांनी  परदेशी तरुणाशी संवाद साधत पाय वाटेने गड सर करत असताना त्याच्या मराठी भाषेविषयीच्या असलेल्या अज्ञानाचा गैरफायदा घेत अश्लिल शब्द शिकवून   त्याच्याकडून म्हणून घेत त्याची व्हिडिओ क्लिप तयार करून समाज माध्यमांवर प्रसिद्ध केल्याने गडप्रेमी, शिवप्रेमी नाराजी व्यक्त करत आक्रमक झाले. हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य आणि  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खडकवासला विधानसभा प्रमुख  नितीन वाघ यांनी पोलिसांना सदर तरुणांवर कडक कारवाई करण्यासाठी निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, परदेशी पर्यटकाचा भाषेबद्दल असलेल्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला. या तरुणांनी मराठी भाषेचा आणि हिंदू संस्कृतीचा अपमान केला आहे. यामुळे आपल्या संस्कृतीची, राज्याची आणि देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी झाली आहे. या तरुणांना शोधून काढून त्यांचे वर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.


याप्रसंगी इतिहास संशोधक डॉ. नंदकिशोर मते,  विभागप्रमुख महेश पोकळे, संघटक तानाजी गाढवे, केतन शिंदे, महेश विटे, कल्पेश वाजे,आकाश कुमावत,  सिंहगड ट्रेकरचे किरण पाटील, ऍड. प्रकाश केदारी, आशिष पराते, रोहित वेद आणि इतर सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी  उपस्थित होते.

See also  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वढू येथे समाधी पूजन