पाषाण : पुणे शहरातील एक शांत, सुसंस्कृत आणि प्रगत भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाषाण – सोमेश्वरवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी युवकांचे नशा करून दहशत निर्माण करण्याचे, गैरवर्तन करण्याचे प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. यावर कडक कारवाई करण्यात यावी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
ही स्थिती केवळ समाजाच्या सुरक्षिततेसाठीच नव्हे, तर परिसरातील लहान मुलं, महिलावर्ग व ज्येष्ठ नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी आहे. पाषाणचा इतिहास हा सुसंस्कृत नागरिकत्वाचा आणि शांततेचा आहे. परंतु सद्यस्थितीत या परिसराच्या प्रतिमेला गालबोट लागण्याची शक्यता दिसत आहे.
सनी निम्हण यांनी रात्रीच्या वेळेस संवेदनशील ठिकाणी नियमित गस्त व ठिकाणी वेळोवेळी तपासणी होणे गरजेचे आहे.परिसरातील सार्वजनिक स्थळे, उद्याने, बसथांबे इत्यादी ठिकाणी अधिक CCTV कॅमेरे बसवून CCTV निगराणी अधिक प्रभावी करावी. प्रशासनाच्या सहकार्याने पाषाण परिसराला सुरक्षित ठेवण्यासाठी स्थानिक नागरिक समितीद्वारे अशा दिशाहीन युवकांची ओळख पटवून त्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या उपाययोजना व कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तरी ही बाब तातडीने लक्षात घेऊन आवश्यक त्या प्रशासनिक आणि पोलीस यंत्रणा सक्रिय करण्याची विनंती सदर पत्रासह करण्यात आली आहे.
घर ताज्या बातम्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाषाण परिसरात कडक कारवाई करून उपाययोजना करण्याची सनी निम्हण यांची...