बाणेर : बाणेर परिसरातील निखिल नंदकुमार धनकुडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) युवक उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांचा कडून ही नियुक्ती करण्यात आली. शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते निखिल धनकुडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष मनोज बालवडकर आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रसाद चौगुले उपस्थित होते.
निखिल धनकुडे यांचे शिक्षण एमबीएपर्यंत झाले असून बाणेर बालेवाडी परिसरातील एक उच्चशिक्षित राजकीय नेतृत्व म्हणून निखिल यांच्याकडे बघितले जाते. निखिल धनकुडे यांचे आजोबा मारुतराव धनकुडे हे बाणेर पंचक्रोशीत राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये एक नावाजलेलं व्यक्तिमत्व होते त्यांचाच वारसा निखिल खंबीरपणे पुढे चालवत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे युवक उपाध्यक्षपदी निवड करून मला जी संधी दिली आहे त्या बद्दल मी पक्षाचा आभारी आहे. परिसरातील युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी मी कायम प्रयत्नशील असेल. असे निखिल धनकुडे यांनी सांगितले.