हडपसर : हडपसर मतदार संघातील मांजरी-केशवनगर विभागप्रमुख आरिफ पटेल यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आनंद दिघे साहेब चौकात उभारण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा परिसरातील नागरिकांना दिलासा देणार असून, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या समाजसेवेच्या विचारांचा प्रत्यक्ष आविष्कार ठरणार आहे. यावेळी शिवसेनेचे पुणे उपजिल्हाप्रमुख तथा शासन नियुक्त नगरसेवक अमर दादा घुले, जिल्हा उपसंघटक पंकज कोद्रे, उपसंघटक दीपक कुलाळ, मा नगरसेवक विकी माने, मांजरी विभाग प्रमुख आरिफ पटेल,अक्षय तारू, शांतनु सरकार, तेजस कोटकर, केविन दोरास्वामी, प्रणव भोसले, विश्वास राजगे, तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
धर्मवीर चौकात शिवसेनेचा सामाजिक भान जागृत करणारा जलसेवेचा उपक्रम, जनतेच्या मनात नवी आशा जागवणारा ठरणार आहे असे प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले.
घर ताज्या बातम्या धर्मवीर चौकात आरिफ पटेल यांनी उभारलेल्या पाणपोईचे उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद...