रक्षक चौक येथिल सबवे ला कै प्रभाकर साठे यांचे नाव द्या- रविराज काळे आप

पुणे : रक्षक चौक पिंपळे निलख येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून  सबवेचे काम चालू आहे. या सबवेला पिंपळे निलख येथिल प्रथम नगरसेवक, पिंपरी चिंचवड महापालिकेचे  माजी महापौर कै प्रभाकर साठे यांचे नाव द्यावे.

1986 साली त्यांनी पिंपळे निलख येथिल नागरिकांना येण्या – जाण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी मोठे परिश्रम घेतले आहेत.रस्ता मिळवण्यात त्यांचा अग्रेसर सहभाग होता.त्यामुळे त्यांचे नाव या सबवेला देणे हा त्यांचा सन्मान असेल.त्यांचे कार्य तरूणांसाठी प्रेरणादायी आहे.त्यांचे नाव या सबवेला द्यावे.अशी  मागणी आपचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केली आहे.

See also  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन