पती – राजीव गांधींच्या देशाप्रती उद्दीष्टांना व ऊत्तरदायीत्वांना वाहुन घेणाऱ्या सोनिया गांधीचे जीवन आदर्श पतिव्रतेचे असून नेहरू गांधी कुटुंबियां विषयी दुस्वासाने आरडाओरड करणारे उथळ…! – वीर माता कविता गाडगीळ यांचे प्रतिपादन

पुणे : स्वर्गीय राजीव गांधी स्वतः वैमानिक तर होतेच पण त्यांनी पंतप्रधान म्हणून भरीव कार्य करताना भारताच्या आशा – आकांक्षांच्या पंखांना बळ देण्याचे काम केले. ते ज्या नेहरू घराण्यातून येतात, त्या नेहरू – गांधी घराण्याविषयी दुस्वासाने आरडाओरड करणारे लोक फारच उथळ आहेत, खऱ्या वारसांना अशी आरडाओरड किंवा, घोषणाबाजी करण्याची गरज नसते असे प्रतिपादन वीर माता कविता गाडगीळ यांनी केले आहे.


स्वर्गीय राजीव गांधी यांच्या ३४व्या पुण्यतिथीनिमित्त ‘राजीव गांधी स्मारक समितीच्या’ वतीने कात्रज येथील राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचा कार्यक्रम आज पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या. कविता गाडगीळ या दिवंगत विंग कमांडर अनिल गाडगीळ यांच्या पत्नी आणि दिवंगत फ्लाईट लेफ्टनंट अभिजीत गाडगीळ यांच्या मातोश्री आहेत.
नेहरूंच्या हयातीपासुन राजीव गांधी पर्यंत या घराण्याची वाटचाल जवळून पाहणाऱ्या त्या साक्षीदार आहेत.


यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या, राजीव गांधी यांनी देशाच्या पायाभरणीत मूलभूत योगदान दिले आहे. त्यांनी ८० च्या दशकात संगणकीकरणाला चालना देताना देशातील असंख्य तरुण संगणक अभियंते तयार केले, याच अभियंत्यांचा आपल्याला सन २००० साली उद्भवलेल्या ‘वाय टू के’ समस्येचे  निराकरण करण्यास उपयोग झाला. आज जगभर जो समृद्ध भारतीय समाज वावरताना दिसतो आहे त्याची निर्मिती ही राजीव गांधी यांनीच् केलेल्या पायाभरणीतून झाली आहे. त्यांनी पंजाब आणि आसाम – सलग प्रांतांत कोणतेही युद्ध न करता शांतता प्रस्थापित केली ती शांतता चिरकाल टिकली आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना त्या म्हणाल्या की त्यांच्यात मला पुराण काळातील स्त्रियांइतकेच धैर्य दिसते. पतीच्या अकाली निधनानंतर पतीच्या मागे केवळ मुलांची जबाबदारी नव्हे तर पती राजीव गांधीच्या देशाप्रती उद्दीष्टांना, कर्तव्यांना, स्वप्नांना व ऊत्तरदायीत्वांना वाहुन घेणाऱ्या सोनिया गांघीचे जीवन हे निःस्पृह व आदर्श पतिव्रतेचे जीवन असल्याचे त्यांनी सांगितले.

See also  औंध गावठाणातील ड्रेनेज लाईनच्या कामाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते भूमिपूजन


राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष गोपाळ तिवारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आपल्या प्रास्ताविक भाषणात ते म्हणाले की आज कविता गाडगीळ यांच्या सारख्या वीर माता व पत्नी या रूपाने राजीव गांधी यांच्या अभिवादन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या याचा सार्थ अभिमान आहे. राजीव गांधी यांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे. राजीव गांधी स्मारक समितीचे ज्येष्ठ सदस्य राजीव जगताप व आबासाहेब तरवडे यांच्या हस्ते तुळशीचे रोप व शाल देऊन कृतज्ञता पर सन्मान करण्यात आला.


यावेळी स्मारक समितीचे सर्वश्री सुर्यकांत उर्फ नाना मारणे, राजीव जगताप, आबा तरवडे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले, भोला वांजळे, प्रदेश विद्यार्थी संघटनेचे भूषण रानभरे, ब्लॅाक काँग्रेस अघ्यक्ष रमेश सोनकांबळे, आबा तरवडे, ॲड फैयाज शेख, ॲड श्रीकांत पाटील, आबा जगताप, संजय अभंग, सुभाष जेधे, हरीभाऊ चिकणे, पै शंकर शिर्के, नरसिंह अंदोली, राजेश सुतार, ॲड स्वप्नील जगताप, विवेक भरगूडे, आशिष गुंजाळ इ उपस्थित होते. समितीचे सदस्य भोला वांजळे यांनी आभार प्रदर्शन केले.