बावधन : बावधन येथील डॉक्टर होमी भाभा रोड(एन डी ए पाषाण रोड)वरील जुन्या बावधन पोलीस स्टेशन समोरील गतिरोधक रविवार दि १८/०५/२०२५ रोजी महापालिकेतर्फे जे.सी.बी मशीन लावून काढण्यात आला. त्याचा राडारोडा पोलीस स्टेशन समोर तसाच ठेऊन देण्यात आला आहे. तसेच जे.सी.बी मशीनने रस्ता खरडल्यामुळे तेथे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात या राडारोड्यामुळे डॉक्टर होमी भाभा रोडवर (एन डी ए पाषाण रोड) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे स्थानिकांना तसेच वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
तरी आपणास विनंती कि येत्या २४ तासात राडारोडा उचलून रस्ता दुरुस्त करावा. राडारोडा उचलून रस्ता दुरुस्त केला नाही तर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल व होणाऱ्या नुकसानीस आपणास जबाबदार धरले जाईल. याबाबत महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांना मनसेच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, उपविभागाध्यक्ष गणेश साळी, संजय तोडमल, प्रभाग सचिव संदीप काळे, शाखाध्यक्ष अशोक मराठे, शाखाउपाध्यक्ष विजय ढाकणे, प्रेमनाथ उमाप, विजय बोरकर, राजेंद्र फुके, किशोर इंगवले व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.