भुगाव येथील काँक्रीट प्लांट चे केमिकल युक्त पाणी रामनदीमध्ये सोडल्याने पर्यावरणाचे नुकसान

भुगाव : भुगाव येथील चोंधे नगर सॉंग बर्ड सोसायटी जवळ असलेल्या काँक्रीट प्लांट मधील केमिकल युक्त सिमेंट पाणी मध्ये सोडण्यात येत आहे. यामुळे नदीपात्र दूषित होण्याबरोबरच केमिकल युक्त पाणी सोडण्यात येत असल्याने पर्यावरणाला देखील मोठा धोका निर्माण झाला आहे.

भुगाव येथील काँक्रीट प्लांट मधील पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट रस्त्यावरून नदीपात्रात सोडण्यात येते. काँक्रीटच्या मोठ्या मिक्सर मधील पाणी स्वच्छतेनंतर नदीपात्रात जात असल्यामुळे काँक्रीट साठी वापरण्यात येणारे केमिकल व काँक्रीट दोन्ही नदीच्या पात्रात मिसळले जात आहे.

दररोज हा प्रकार काँक्रीट प्लांट चालकाकडून होत असल्याने पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून जैवविविधतेवर देखील याचा गंभीर परिणाम होत आहे. भुगाव च्या खालोखाल असलेल्या ऐतिहासिक पाषाण तलावामध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाणी सोडले जात असल्याने दुर्गंधी निर्माण झाली आहे.

पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या काँक्रीट प्लांट चालकावर कारवाई करण्यात यावी तसेच हा प्लांट तातडीने बंद करण्यात यावा अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

See also  मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते बाणेर येथे मराठा सहाय्यक समिती कार्यालयाचे उद्घाटन