बाणेर : जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने पावसाळी सुरक्षा मोहीमे अंतर्गत बालेवाडी रस्ता येथील प्रकृती सोसायटी येथे रस्त्यावरून वाहणारे पाणी सोसायटीच्या गेट समोर साचत होते. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांना पाण्यामुळे ये-जा करण्यास अडचण निर्माण होत होती.
ही बाब येथील रहिवासी लोकांनी लक्षात आणून देताच, जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी यशस्वीपणे हे काम पूर्ण केले आणि साठलेल्या पाण्याचा पूर्ण निचरा केला. तसेच यापुढे पाणी साठू नये यासाठी उपाययोजना करण्यात आली.