ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलेन्स मध्ये चित्रकला स्पर्धेचे  आयोजन -चित्रकलेतून महाकुंभ मेळ्यातील अध्यात्मिकतेचे दर्शन

पुणे: महाकुंभ मेळा-२०२५ प्रयागराज येथे भरला आहे. हा मेळा अध्यात्मिकतेचा सोहळा असतो. या मेळ्यात मोठ्या संख्येने भाविक व साधू एकत्र येतात. या कुंभमेळ्याचे औचित्य साधून सी.बी.एस.सी च्या परिपत्रानुसार ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलेन्स मध्ये प्रयागराज येथे सुरु असलेल्या आध्यात्मिक उत्सव महाकुंभच्या सांस्कृतिक आणि औपचारिक परंपरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये इयत्ता ६ वी,७ वी व ८ वी चे विद्यार्थी सहभागी झाले होते.


या स्पर्धेला संस्थेचे अध्यक्ष श्री.सागर ढोले पाटील,शाळेच्या मुख्याध्यापिका प्राचार्या डॉ.अनुराधा अय्यर  आणि चित्रकला विषयाच्या शिक्षिका सौ.ज्योती वाघचौरे यांचे मार्गदर्शन लाभले.

See also  न्या. संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर