कसबापेठ विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती अभियानाचे आयोजन

पुणे, दि. २ : महात्मा गांधी जयंती निमित्त कसबापेठ विधानसभा मतदार संघात स्वीप कार्यक्रमांतर्गत आप्पासाहेब जेधे कला वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नंतर रॅलीच्या माध्यमातून ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा’ अशा घोषणा देत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी मतदान आपला हक्क असून सर्वांनी मतदान करावे. आपल्या परिसरातील नागरिकांना मतदान करण्याविषयी प्रवृत करावे, असेही आवाहन करण्यात आले.

भारत निवडणूक आयोगाच्या https://www.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा वोटर हेल्पलाईन ॲपवर ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करता येते, असेही रॅलीच्या माध्यमातून सांगण्यात येत होते.

See also  बालवडकर प्राथमिक शाळेमध्ये स्कॉलरशिप परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न