हडपसर : हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालय हद्दीत अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत न्याती इस्टेट महंमदवाडी, मांजरी रस्ता, रेणुका माता मंदिर केशवनगर,रवि दर्शन सोलापूर रस्ता, हॅण्डबॉल स्टेडियम डिपी रस्ता येथे अनधिकृत व्यावसायिकांवर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली.
यावेळी हातगाडी – १३, काउंटर – ०३, पथारी – १०, स्टॉल – ०१, इतर – ०४ व्या. वाहन – ०१ कारवाई करून जप्त करण्यात आले.
कारवाईसाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १२ जवान, ३ पोलिस कर्मचारी , वानवडी रामटेकडी क्षेत्रिय कार्यालय, मध्यवर्ती पथक व हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालय अतिक्रमण विभागाचे कर्मचारी ,बिगारी सेवक , सहायक अतिक्रमण निरीक्षक १०, ओपन ट्रॅक ०४,पिंजरा वाहन ०२ अशी यंत्रणा वापरण्यात आली. हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालय अतिक्रमण निरीक्षक श्री. राकेश काची, सहायक निरीक्षक श्री.वैभव जगताप,राहुल डोके, ज्ञानेश्वर बावधने,सचिन जाधव,पंकज पालाकुडतेवार,कुणाल मुंढे, हाशम पटेल, साईनाथ निकम , श्लोक तारु यांच्या धडक कारवाई पथकाने अतिक्रमण निर्मूलन विभाग उपआयुक्त श्री.संदीप खलाटे, महापालिका सहायक आयुक्त श्री.बाळासाहेब ढवळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली.अनधिकृत व्यावसायिकांनी अनधिकृत व्यवसाय बंद करावे, स्वतःचे नुकसान टाळावे तसेच अनधिकृत अतिक्रमणांवर यापुढे देखील वारंवार व नियमितपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण निरीक्षक श्री. काची यांनी सांगितले.