औंध : औंध येथील रोहन निलय १ या सोसायटीमधे अबाल-वृध्दांसाठी कलाकार कट्टा, निलयकरांची कला-भरारी या नावाने हा उपक्रम सुरू करण्यात आले.
सोसायटीतील ज्येष्ठ कलाकार श्री शरदचंद्र नाडकर्णी यांच्या शुभ हस्ते कलाकार कट्टाच्या बोध चिन्हाचे अनावरण करण्यात आले. श्री नाडकर्णी हे ओरिगामी कला क्षेत्रातील जाणकार व अनुभवी कलाकार असून त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
कलाकार कट्ट्याच्या पहिल्या प्रदर्शनीय समारंभात,गाणे, मिमीक्री, अभिवाचन, गिटार वादन असे विविध कलागुण सादर केले गेले. भरघोस प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमातील आणखी एक आकर्षण म्हणजे चित्रप्रदर्शन ! सोसायटीतील सहा कलाकारांची चित्रे या प्रदर्शनात ठेवण्यात आली.
कलाकार कट्टा या संकल्पनेत श्री हरनीश राजा, श्री के.के. रंगा, श्री गंगाधर हवालदार, श्री सुरेश पणीकर, श्री रफिक नगारजी श्री देवदत्त भट व श्रीमती कांचन पटवर्धन यांनी नियोजन व प्रत्यक्ष कार्यक्रम संपन्न होण्यात मोलाचा वाटा उचलला.
सोसायटीचे सेक्रेटरी श्री शिवतरे यांनी कलाकार कट्टा साठी सोसायटी तर्फे सर्व सुविंधा उपलब्ध करून दिल्या.
सर्व कलाकार व कट्टा सभासद यांचा सत्कार श्री शिवतरे, सेक्रेटरी रोहन निलय, यांच्या हस्ते करण्यात आला. उत्तरोत्तर ह्या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी त्यांनी कलाकरांना व रसिकांना आवाहन केले.महिन्यातून एकदा, पहिल्या रविवारी कलाकार कट्टाचा कार्यक्रम होणार असे श्री हरनीश राजा यांनी या वेळी नमुद केले.