म्हाळुंगे टीपी स्कीम लवकरात लवकर मान्यता घेऊन विकास कामांना गती मिळणे बाबत अमोल बालवडकर यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेत निवेदन दिले

पुणे : म्हाळुंगे-माण टीपी स्कीम लवकरात लवकर मान्यता घेऊन विकास कामांना गती मिळणे बाबत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी बालवडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली म्हाळुंगे माण टीपी स्कीम हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. सदर टीपी स्कीम योजना ही येथील स्थानिक नागरिक व  शेतकऱ्यांनी मान्यता दिली होती. पीएमआरडीए च्या माध्यमातून गेली अनेक वर्षांपासून या प्रकल्पावर काम सुरू आहे, परंतु अजून या प्रकल्पास अंतिम मान्यता मिळालेली नाही. काही तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर या योजनेचा आराखडा तयार व्हावा व अंतिम मान्यता मिळावी. तसेच लवकरात लवकर या भागात विकास कामे सुरू व्हावी अशी मागणी माझे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन केली

माण महाळुंगे हायटेक सिटी प्रकल्प तांत्रिक अडचणीमुळे विकसित होत नसल्याने शेतकऱ्यांच्या फार मोठ्या अडचणीत निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांना जागा ताब्यात मिळाल्या नाहीत तर प्रकल्प देखील रखडले असल्याने महाळुंगे गाव हे महानगरपालिकेत येऊन देखील विकसित होत नसल्याने मूळ शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याबाबत अमोल बालवडकर यांनी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या अडचणी सांगून सदर प्रश्न सोडवण्यात यावा अशी विनंती यावेळी केली.

See also  10 वीचा पेरिविंकल इंग्लिश मीडियम शाळेची 100% निकालाची परंपरा कायम