सिंहगडावर अतिक्रमण कारवाई; वार्तांकनासाठी पत्रकारांना सिंहगडावर  मनाई, आपत्ती व्यवस्थापनासाठी संयुक्त पाहणी करणार असल्याची वन विभागाची माहिती

खडकवासला :  पर्यटकांचे आकर्षण असलेल्या किल्ले सिंहगडावर वन विभाग, महसूल आणि पुरातत्व विभाग यांची संयुक्त अतिक्रमण कारवाई सध्या सुरू असून सकाळी सहा वाजता वन विभागाच्या दीडशे ते दोनशे कर्मचारी फौजफाट्यासह अतिक्रमण कारवाईसाठी रवाना झाले आहेत. तथापि पर्यटकांसाठी सिंहगड बंद ठेवण्यासाठी काल वन विभागाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनासाठी संयुक्त पाहणी करण्यासाठी सिंहगड  बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले परंतु प्रत्यक्षात मात्र अतिक्रमण कारवाई चालू असल्याचे सुत्रांकडून समजले आहे. सदर वार्तांकनासाठी पत्रकारांना गडावर जाण्यास बंदी करण्यात आली आहे.

सिंहगडावर वाहनाने जाणाऱ्या रस्त्यावर गोळेवाडी येथील  उपद्रव शुल्क नाक्यावर वन विभागाने बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्यांना पोलीसही मदत करत आहेत. सदर प्रतिनिधी वार्तांकरांसाठी सिंहगडावर जात असताना  उपद्रव शुल्क नाक्यावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गडावर जाण्यासाठी बंदी करण्यात आले असल्याचे सांगितले. यावेळी हवेली तालुक्याचे प्रांत तथा उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाची  पाहणी चालू आहे का अतिक्रमाची कारवाई चालू आहे याविषयी माहिती देण्यास नकार दिला. तर वनविभागाची कारवाई असताना वन विभागाचे अधिकारी नॉट रिचेबल असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. आपत्ती व्यवस्थापनाच्या संयुक्त  पथकाची पाहणी चालू नसून गडावर अतिक्रमण कारवाई चालू असल्याचे उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले. वन विभागाने आपत्ती व्यवस्थापन पथक संयुक्त पाहणी करणार असल्याची दिशाभूल करणारी माहिती का दिली याविषयी माहिती नसल्याचेही त्या म्हणाल्या.

See also  मोदी सरकारने मागासवर्गीयांचे ५ लाख ५४ हजार कोटी गोठवले : ई. झेड खोब्रागडे