खडकवासला : सिंहगड रस्त्यावर राष्ट्रीय जल आयोगाच्या गेटजवळ (एन डब्ल्यू ए) पादचारी भुयारी मार्गाच्या पुलासाठी खोदकाम करताना परिसरातील झाड उच्च दाब वीज वाहिनीवर पडल्याने तारा तुटून वीज पुरवठात खंडित झाला आहे. दुपारी साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली. तारा तुटताना घर्षणाने वीज वाहिन्यांचा मोठा आवाज झाल्याचे एनडब्ल्यूए मधील कर्मचाऱ्यांनी सांगितले. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी त्यामुळे नऱ्हे, धायरी आणि वडगाव मधील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
मुख्य सिंहगड रस्त्यावर राष्ट्रीय जल आयोगाच्या गेट जवळ आयोगाच्या कर्मचाऱ्यांना आणि प्रशिक्षणार्थी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पादचारी भुयारी मार्गाचे काम चालू आहे. या कामासाठी एनडब्ल्यूएच्या परिसरातील झाडांच्या मधून खोदकाम चालू आहे. हे खोदकाम करताना एक मोठे निलगिरीचे झाड सिंहगड रस्त्यावर असलेल्या उच्च दाब वीज वाहिनीवर पडल्याने एक खांब वाकला तर वीज वाहिन्या तुटल्या आहेत. वीज वाहिनी तुटताना मोठ्याने आवाज झाल्याचे एनडब्ल्यूए मधील कर्मचाऱ्यांनी सांगितले. या अपघातात कोणतीही जीवित हानी अथवा जखमी झाले नसल्याचे पुलाचे काम करणाऱ्या प्रत्यक्षदर्शी मजूर नागरिकांनी सांगितले. या खोदकामामुळे परिसरातील दहा ते बारा झाडे बाधित झाली असून या कामासाठी निविदा धारक ठेकेदाराने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करताना स्पष्ट केले. तर पडलेल्या झाडाचे त्याच ठिकाणी कटिंग करून पुनःरोपन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त तिमय्या जंगले यांनी सांगितले.
शिवलिंग बोरे,सहाय्यक अभियंता, विद्युत वितरण कंपनी, – “धायरी सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी पावर हाऊस मधून वितरित होणाऱ्या उच्च दाब वीज वाहिन्यावर झाड पडल्याने तुटल्या आहेत. त्यामुळे वडगाव धायरी आणि नऱ्हे भागातील वीज पुरवठा खंडित झाला असून दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्यात आली आहे.”
किमया जंगले,सहाय्यक आयुक्त , सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय-
एनडब्ल्यूए परिसरात दहा झाडांना त्रास होईल अशा पद्धतीने कोणती परवानगी न घेता पावसाळी गटार लाईन सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) केली आहे. त्यामुळे त्यांना आणि काम करणाऱ्या ठेकेदाराला कारवाई करण्यासाठी कायदेशीर नोटीस देण्यात येणार आहे.