पाषाण येथे गुजराती समाज रास गरबा दांडिया

पाषाण : नवरात्र उत्सवानिमित्त पाषाण येथील ज्ञानदिप मंगल कार्यालय येथे अमोल बालवडकर फाऊंडेशन व बहेनपाणी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने विशेष गुजराती समाज रास गरबा दांडीया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण परिसरातील हजारो गुजराती बांधवांनी व नागरीकांनी सहपरिवार या रास गरबा कार्यकर्मात सहभाग नोंदवला. तसेच विविध स्पर्धांचे बक्षिसांचे वितरण देखिल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर,कोथरुड (उ) विधानसभा अध्यक्ष सचिन पाषाणकर, युवा मोर्चा अध्यक्ष रोहन कोकाटे, योगिता कोकाटे, रोहन कांबळे, संयोजक रिना सोमैय्या, देविना थमकी, रेखा ढामेचा, महेश मेहता उपस्थित होते.

See also  लाक्षणिक हेल्मेट दिवशी लक्षणीय प्रबोधन पुणेकरांकडून उपक्रमाची प्रशंसा