विद्यार्थी कुस्ती परिषदेत शौनक झोरे आणि रिद्धी थोपटेंची विजयी व गदेचे मानकरी ठरले

पुणे : विद्यार्थी कुस्ती परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्र मंडळ, टिळक रोड, पुणे येथे  ३५१ व्या शिवराज्यभिषेक दिना निमित्त जिल्हास्तरीय कुमार भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले. या मैदानात एकूण 75 मैदानी कुस्त्यांचा थरार पाहायला मिळाला.

मुलांच्या गटात पै. शौनक झोरे महाराष्ट्र मंडळ तालीम आणि मुलींच्या गटात पै. रिद्धी थोपटे खाशाबा जाधव संकुलन यांनी आपली शेवटची लढत जिंकत विजेतेपद पटकावले. त्यांनी ‘विद्यार्थी कुस्ती परिषद, महाराष्ट्र राज्य’ किताबाची मानाची गदा आपल्या नावावर केली.

या कुस्ती मैदानात पुणे जिल्ह्यातील एकूण 19 कुस्ती केंद्रांमधील मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. लढती अतिशय चुरशीच्या झाल्या आणि प्रेक्षकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश कुस्ती परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, आमदार हेमंत रासने, तसेच माजी आमदार मोहन जोशी, टाटा मोटर्स युनियन जनरल सेक्रेटरी अजित पायगुडे, शिवसेना शहर अध्यक्ष संजय मोरे, महाराष्ट्र मंडळ संचालिका नेहा दामले मॅडम, वस्ताद संभाजी शिंदे,कॉंग्रेसचे कसबा अध्यक्ष अँड प्रवीण करपे, सुरेश कांबळे, राष्ट्रवादी कसबा अध्यक्ष गणेश नलावडे आपचे किरण कद्रे, क्रीडा सेल अध्यक्ष डॉ मदन कोठुळे, दिपक पोकळे, अ.भा मराठा महासंघ प. महाराष्ट्र सरचिटणीस नामदेव मानकर,कृषी उत्पन बाजार समिती संचालक नितीन दांगट, उद्योजक सुधाकर पवार, आबा जगताप, डॉ राजेंद्र भावाळकर, राकेश गायकवाड, सागर दिसले,सारीका पारेख, उदय लेले, विलास काथुरे सर, अब्दुल शेख,यांनी उपस्थित राहून खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यांनी कुस्ती कलेला प्रोत्साहन देत, नव्या पिढीतील खेळाडूंना मेहनतीने पुढे जाण्याचा सल्ला दिला.
कु काजल जाधव ऑल इंडिया कुस्ती चॅम्पिअन 11 वेळेस दोन टाइम खेळो इंडिया गोल्ड मेडल यांची महसुल सहाय्यक निरीक्षक पदी निवड झाल्या बद्दल परिषद तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. पंच कमिटी मध्ये N I S कोच पै तुषार गोळे, पै संदिप जगदाळे, पै निंकुज उभे, पै प्रदिप पवार, पै संतोष जगदाळे यांनी आपली पंचाची भुमिका बजावली

ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली असून, पुढील स्तरावरील कुस्ती स्पर्धांसाठी खेळाडूंना नवे बळ आणि प्रेरणा मिळाली आहे.
ह्या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष युवराज दिसले, पै श्याम उर्फ समिर शिंदे, सचिन वडघुले, भरत गायकवाड, पै.सुर्यकांत येनपुरे, सुनिल पवार, रविंद्र दळवी यांनी केले सुत्रसंचालन सागर चौधरी यांनी केले.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा शुभारंभ