बालेवाडी : बालेवाडी येथे नवचैतन्य हास्ययोग परिवारने केला योगदिन साजरा करण्यात आला.
योगाभ्यास नियमितपणे केल्याने मन व शरीर निरोगी बनते, असे विचार श्री.पद्माकर राऊत यांनी आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. नवचैतन्य हास्ययोग परिवार, बालेवाडी शाखेच्या योग दिनानिमित्त योगासने व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात योग शिक्षीका वंदना पाटील यांनी उपस्थितांची योगाचे विविध प्रकार घेऊन केली. कार्यक्रमाचे नियोजन ॲड.एस.ओ.माशाळकर यांनी केले होते.
यावेळी नवचैतन्य हास्य परिवाराचे बालेवाडी शाखेतील सर्व सदस्य उपस्थित होते.