मनाचे श्लोक स्पर्धेत विजेत्या बालकांनां मोफत २५ सायकलीचे वाटप

पुणे : गुरुपोर्णिमेच्या निमित्याने भगवती मंदिर बाणेर येथे भगवती सेवाश्रम व जीवन कौवल्य विकास या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मनाचे श्लोक स्पर्धेत विजेत्या बालकांनां मोफत २५ सायकलीचे वाटप करण्यात आले.

मोफत संगणक प्रशिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प.पू. श्री.बाबू महाराज मानवतकर यांचे शिष्यगण उपस्थित होते. कार्यक्रमात बाणेर येथिल दानशूर व्यक्तीमत्व श्री.अशोकजी नवाल, सुशिल अग्रवाल, दयानंद चिखलकर, डॉ.शाम दलाल,अजय कदम, चिटणीस, इ.व्यक्तीमत्व उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यास गिरीधर राठी,प्रकाश बोकील, डॉ.श्याम कुलकर्णी, डॉ.पुष्कर दलाल, रामधनी , नंदकूमार काब्रा, रमेश धूत व बालकांचे माता-पीता उपस्थित होते.

See also  पाषाण येथील चेंबरची झाकण दुरुस्त करण्याची मनसेची मागणी