मुंबई-पुणे प्रवास महागणार; १ एप्रिलपासून एक्स्प्रेस हायवेवरील टोलध्ये १८ टक्के वाढ होणार

पुणे :- नव्या आर्थिक वर्षात नागरिकांच्या खिशाला अनेक मार्गांनी चटका बसू शकतो. त्यातलाच एक मार्ग ठरणार आहे रस्ते प्रवासादरम्यान येणारा टोल. वाहनधारकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर टोलचे दर पुन्हा वाढणार आहेत. 1 एप्रिलपासून टोल दरांत तब्बल 18 टकक्यांनी वाढ होणार आहे. मुंबई – पुणे असा प्रवास करणाऱ्यांना जास्तीचे पैसे भरावे लागणार आहेत.

नव्या दरांनुसार कारचा टोल 270 रुपयांवरून 316 रुपये होणार आहे. तर, बससाठी टोलचा 795 वरुन 940 रुपयांवर जाणार आहे. ट्रकसाठी इथं सध्या 580 रुपये द्यावे लागत होते. यापुढे 685 रुपये द्यावे लागणार आहे. तर टेम्पोसाठी 420 रुपयांऐवजी 495 रुपये इतका टोल द्यावा लागणार आहे.

1 एप्रिलपासून टोल दरवाढ होणार..
1 एप्रिलपासून देशात टोल टॅक्सच्या दरात वाढ केली जाणार आहे. ज्यामुळं रस्ते मार्गानं प्रवास करणाऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकटच उभं राहणार आहे. देशातील काही राज्यांमध्ये ही टोल दरवाढ लागू असेल. यामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब या राज्यांचा समावेश आहे.

See also  नाथपंथीय महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाचे राज्यभरात स्वागत