महाळुंगे येथील रस्त्यांमध्ये असलेले अडथळे, दगड काढण्याची मागणी

पुणे : पुणे महानगरपालिका वेळेवर खड्डे बुजवण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र सध्या पुणे शहरातील नागरिकांना पाहायला मिळत आहेत. परंतु रस्त्यांमध्ये अडथळे ठरणारे दगड तसेच रस्त्यातील इतर अडथळे दूर करण्यासाठी देखील प्रयत्न केले जात नाहीत.

सांगितल्याशिवाय काम होत नसल्याची पुणे महानगरपालिकेची परंपरा निर्माण होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. रस्त्यांमधील खड्डे बुजवण्यासाठी नागरिकांना प्रत्येक रस्त्याची वेगळी तक्रार पुणे महानगरपालिकेत करावी लागत आहे. याशिवाय पथविभागातील अधिकारी रस्त्यावरील खड्डे स्वतःहून मुजवत नाहीत यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

महाळुंगे बाणेर बालेवाडी परिसरात रस्त्यामध्ये असलेले दगड, कचऱ्याचे मातीचे ढीग तसेच पडून आहेत. यामुळे वाहतूक कोंडी ठरणाऱ्या रस्त्यांवर एक लेन कमी होत असून यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सतत करावा लागतो.

रस्त्यांवरील पादचारी मार्गावरील अडथळे दूर करावेत तसेच रस्त्यांमध्ये वाहतूक क्षमता कमी करणारे अडथळे काढण्यात यावेत अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  पाषाण मुंबई पुणे महामार्ग वरील विनापरवाना शो रूम, फर्निचर मॉलवर बांधकाम विभागाची पुन्हा जोरदार कारवाई