९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला ‘क्रांतीज्योत’ यात्रा काढून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहिदांना अभिवादन

पुणे : ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन ते हुतात्मा बाबूगेणू स्तंभ, मंडईपर्यंत ‘क्रांतीज्योत यात्रा’ काढून शहिदांना अभिवादन करण्यात आले.

क्रांतीज्योत यात्रेचा मंडई येथील हुतात्मा बाबूगेणू स्तंभास पुष्पहार अर्पण करून समारोपीय भाषणात अध्यक्ष *अरविंद शिंदे* म्हणाले की, ‘‘दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. या लढ्यात गोंदिया जिल्ह्यातील काही लोकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांतिलढ्याची आठवण म्हणून ९ ऑगस्टला ‘क्रांती दिन’ पाळला जातो. परंतु आज या दिवसाचे महत्व नवीन पिढीलाच नाही, महात्मा गांधीच्या ‘‘अंग्रेज चले जाव’’ या घोषणेमुळे लाखो सत्याग्रही देशाच्या विविध भागात ब्रिटीश साम्राज्याच्या विरोधात चले जाव चे आंदोलन करायला लागले. त्यावेळेस लाखो देशवासियांच्या मनात एकच ध्येय होते की भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे. १९४२ च्या मुंबईला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये छोडो भारत आंदोलनाचा ठराव संमत झाला. काँग्रेसने या देशामध्ये अखंडत्व, सार्वभौमत्व ठेवले याचे स्मरण देशवासियांनी करायला पाहिजे. १९४० ला वर्ध्याच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पूर्ण स्वराज्याचा विषय मांडण्यात आला त्यानुसार पं. जवाहरलाल नेहरूंची एकतेची, अखंडतेची परंपरा त्यांच्या मुलीने, नातवाने अखंडपण चालू ठेवली याचे स्मरण करणे गरजेचे आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, सुडाची भावना न ठेवता हा देश अखंड राहिला पाहिजे. मी त्या लढ्यातील लाखो हुतात्म्यांना शतश: प्रणाम करून आदरांजली अर्पण करतो.’’

यानंतर *महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे खजिनदार ॲड. अभय छाजेड* यांनी स्वातंत्र्याचा इतिहास विशद केला. यावेळी माजी आमदार दिप्ती चवधरी, धनंजय दाभाडे, कमल व्‍यवहारे, अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू, वैशाली मराठे, यशराज पारखी, मेहबुब नदाफ, गुलाम हुसेन खान, राज अंबिके, द. स. पोळेकर, सतिश पवार, विनोद रणपिसे, प्रदिप परदेशी, समिर शेख, सुजित यादव, राजू ठोंबरे, अक्षय माने, हेमंत राजभोज, रमेश सकट, रमेश सोनकांबळे, अनिल पवार, सेवादलाचे प्रकाश पवार, लतेंद्र भिंगारे, ॲड. रमेश पवळे, गणेश गुगळे, संतोष आरडे, विल्सन चंदवेल, प्राची दुधाने, अर्चना शहा, सीमा सावंत, माया डुरे, अनिता धिमधिमे, प्रियंका मधाळे, सुदंरा ओव्‍हाळ, अनुसया गायकवाड, ज्योती परदेशी, राजेश मोहिते, महेश विचारे, अशोक लोणारे, संतोष वाघमारे, योगेश नायडू, नुर शेख, विकार शेख, ॲड. नंदलाल धिवार, संदिप मोकाटे, सचिन भोसले, नवाज सय्यद, राज घेलोत, चेतन पडवळ, अमित कांबळे, वैभव डांगमाळी, देवीदास लोणकर, नरसिंह अंदोली, मतीन शेख, अक्षय बहिरट, संतोष सुपेकर, संजय डोंगरे हर्षद हांडे, योगीराज नाईक, शेहबाज शेख, फारूक नदीवाले, युसूफ शेख, रामदास केदारी आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  पावसाळ्यात नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई देण्यात यावी - खासदार मेधा कुलकर्णी