गुडलक चौकात युवक काँग्रेसचे आंदोलन; “PM कॉम्प्रमाईज”चा आरोप, अनेक पदाधिकारी ताब्यात

पुणे : AI Summit दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये देशाचे पंतप्रधान अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डील व इतर करार करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि पुणे शहर युवक काँग्रेस यांच्या वतीने डेक्कन येथील गुडलक चौक येथे आंदोलन करण्यात आले. “PM is Compromised” हा मुद्दा घेऊन देशभर आंदोलन सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आंदोलनादरम्यान Epstein फाइल्समधील कथित खुलासे, माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या पुस्तकातील उल्लेख, तसेच संसदेत या विषयांवर चर्चा टाळली जात असल्याचा आरोप करण्यात आला. अमेरिकेसोबतच्या ट्रेड करारांमुळे देशाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.युवक काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, AI Summit दरम्यान शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून अनेकांना ताब्यात (डिटेन) घेण्यात आले. उदय भानू चीब यांनाही अटक करून स्पष्ट कारणे न देता डिटेन केल्याचा आरोप करण्यात आला. काही पदाधिकाऱ्यांची सुटका उशिरापर्यंत झालेली नसल्याचेही सांगण्यात आले.

हे आंदोलन महाराष्ट्राचे प्रभारी अजय चीकारा आणि प्रदेशाध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. सहप्रभारी शांभवी शुक्ला यांनी “PM कॉम्प्रमाईज आहेत हे देशाला कळण्यासाठी युवक काँग्रेस संपूर्ण देशभर आंदोलन करेल,” असे सांगितले.
पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया
प्रथमेश आबनावे (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस)
“देशाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डील करून देशहिताला तिलांजली दिल्याचा गंभीर प्रश्न आम्ही उपस्थित केला आहे. संसदेत चर्चा न करता मुद्दे दडपले जात आहेत.”
“शांततेत आंदोलन करूनही आमच्या पदाधिकाऱ्यांना डिटेन करणे हे लोकशाहीविरोधी आहे.”
सौरभ आमराळे (शहराध्यक्ष, पुणे शहर युवक काँग्रेस)
“लोकशाही मार्गाने प्रश्न विचारणे हा आमचा अधिकार आहे. सरकार उत्तर देण्याऐवजी दडपशाही करत आहे.”
“सत्य बाहेर येईपर्यंत युवक काँग्रेस आंदोलन सुरू ठेवेल.”
उमेश पवार (अध्यक्ष, पुणे जिल्हा युवक काँग्रेस)
“देशहिताच्या गंभीर मुद्द्यांवर संसदेत चर्चा टाळली जात आहे, म्हणून युवक रस्त्यावर उतरले आहेत.”
“शांततापूर्ण आंदोलनावर कारवाई म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणे आहे.”
कौस्तुभ नवले (अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेस)
“सरकारने पारदर्शक भूमिका जाहीर करावी; आंदोलन दडपून प्रश्न संपणार नाहीत.”
“युवक काँग्रेस देशहितासाठी लढा सुरूच ठेवणार आहे.”
आंदोलनादरम्यान काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
आंदोलनात विवेक कडू, कुणाल काळे, यश कोलते, अक्षय नवगिरे, ऋषिकेश थोरात, सागर धाडवे, आनंद दुबे, सद्दाम शेख, निखिल मलके, रमेश सातपोते, मेघशाम धर्मावत, प्रदीप मेहकरे, विकास सुपणर, चैतन्य जयभाये, स्वप्नील बनसोडे, रोहित पाटोळे, स्वरूप केदारी, वीरधवल गाडे, गणेश सहाणे, औदुंबर आगलावे, स्वप्नील शेलार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

See also  ‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन