पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी अनेक वाहन धारकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता तत्काळ वाहतुकीसाठी खुला करावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी पीएमआरडीएला दिले आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. यासाठी काही दिवसांपूर्वी तेथे असलेला उड्डाणपुल पाडला होता. त्याजागी आता मेट्रो, तसेच वाहतुकीसाठी रस्ता असणारा दुमजली उड्डाणपुल तयार करण्यात आला आहे. यातील एका रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. पुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री तसेच पालकमंत्री यांचा वेळ मिळत नसल्याने हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होत नाही असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असल्याने सातत्याने वाहन धारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे नेत्यांच्या उद्घाटनाची वाट बघत बसण्यापेक्षा स्वातंत्र्य दिनापर्यंत हा पुल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.