औंध : औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत हर घर तिरंगा मोहीम २०२५ नुसार हर घर तिरंगा, हर घर स्वछता, स्वतंत्रता का उत्सव स्वछता के संग या अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम तसेच कचरा वर्गीकरण याबाबत प्रबोधन करणेत आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा औंध येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
या ठिकाणी प्रभाग क्र. 8 या भागातील जेष्ठ नागरिक औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे माजी नगरसेविका श्रीमती अर्चना मुसळे, माजी नगरसेवक आनंद छाजेड, श्री मधुकर मुसळे, भाजपाचे नेते सचिन वाडेकर, श्री गणेश कलापुरे सामाजिक कार्यकर्ते अनिल भिसे, संकेत कांबळे, सुप्रीम चोंदे, अनिकेत भिसे. मोकदम रोहीत शेंडगे व सफाई सेवक कर्मचारी उपस्थित होते.
घनकचरा विभागाचे मा.उप आयुक्त मा. श्री संदिप कदम साहेब,परिमंडळ क्रमांक २ चे मा. उप आयुक्त श्री. अरविंद माळी साहेब औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाचे मा.महापालिका सहाय्यक आयुक्त मा. श्री. गिरीश दापकेकर यांच्या आदेशानुसार व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री.विजय भोईर, आरोग्य निरीक्षक श्री प्रमोद उकिर्डे, श्री निखिल निकम, श्री प्रवीण दिवेकर यांचे मार्गदर्शनाखाली हे अभियान थांबवण्यात आले.