‘आप’तर्फे दहीहंडी सोहळा – उत्सव, समाजकार्य आणि शैक्षणिक उपक्रमांची सांगड

पिंपरी : आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य व पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी सोहळा अतिशय उत्साहात आणि दणदणीत वातावरणात पार पडला. गोविंदा पथकांच्या थरारक कलाबाज्या, श्रीकृष्ण जयघोषांचा गजर आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर रंगून गेला.

या अविस्मरणीय सोहळ्याला मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून मा. अजितजी फाटके (कार्याध्यक्ष, आप महाराष्ट्र प्रदेश), मा. सिद्धेश भैय्या भगत (राष्ट्रीय उपाध्यक्ष, युवा आघाडी), मा. अमित भाऊ म्हस्के (महाराष्ट्र राज्य समन्वयक) व मा. मयूर दौंडकर (युवक प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मा. श्री.अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने साजरा करण्यात आला.

तसेच या सोहळ्याला सामाजिक व शैक्षणिक अधिष्ठान देत काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी जाहीर केलेल्या शिष्यवृत्ती वितरणाचा कार्यक्रमही संपन्न झाला. काई. मुक्ताबाई रामचंद्र बालवडकर यांच्या स्मरणार्थ दिली जाणारी सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप कु. रसिका गायगोले हिला प्रदान करण्यात आली. तर काई. शंकर नारायण घोडके यांच्या स्मरणार्थ दिली जाणारी महात्मा जोतिबा फुले स्कॉलरशिप, ची. सुरज सोमुसे आणि ची. सुजल जौजाळकर यांना देण्यात आली.

हा सोहळा केवळ परंपरेपुरता मर्यादित न राहता परंपरेचा वारसा, सांस्कृतिक जपणूक आणि शैक्षणिक संदेश देणारा उपक्रम ठरला. विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी, नव्या पिढीला प्रोत्साहन मिळावे तसेच समाजाच्या दृष्टीने हिताचे निर्णय राबवले जात असल्याचा संदेश देण्यात आला.

या दहीहंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. सर्व गोविंदा पथकांना, आयोजक मंडळाला व नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आम आदमी पार्टीच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

See also  सिद्धार्थ शिरोळे यांना औंध भागातील युवकांचा वाढता पाठिंबा, विविध मंडळातील कार्यकर्त्यांशी,  नागरिकांशी प्रत्यक्ष भेटी