औंध : रोहन निलय-१ ही औंध परिसरामधील एक सुंदर हाऊसिंग सोसायटीमध्ये १५ ऑगस्ट या दिवशी ७९वा स्वातंत्र्य दिन ही असाच उत्साहात साजरा झाला. गोकुळाष्टमी निमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. श्रीकृष्णाच्या मुर्तीच्या साक्षीने सोसायटीतीलअनेक महिलांतसेच पुरुषांनी कृष्णाची गाणी आणि भजन सादर केले. गोविंदाची गाणी ऐकत ऐकत एकदा मुलींनी आणि एकदा मुलांनी अशी दोन वेळा दहीहंडी फोडली गेली.
सोसायटीतील सभासदांचा उत्साह कौतुकास्पद होता. कार्यकारिणीचे सभासद ही यामध्ये आनंदाने सहभागी झाले होते.
सोबतच खाण्याच्या पदार्थाचे स्टाॅलही असल्याने लोकांनी त्याचाही मनमुराद आस्वाद घेतला.RNCC म्हणजे रोहन निलय कल्चरल कमिटीने हा कार्यक्रम आयोजित केला होता.