“दादा एक पहाटेचा दौरा धायरीच्या डीपी रोडला पण होऊन जाऊ द्या की” धायरी गाव डीपी रोडबाबत ग्रामस्थांची होर्डिंग लावून पालकमंत्र्यांकडे केली मागणी

पुणे : धायरी परिसरातील नागरिकांनी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या डीपी रोडच्या कामाबाबत ठाम भूमिका घेतली आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, धायरीचा डीपी रोड केवळ आश्वासनांत न राहता तातडीने पूर्ण व्हावा असे मागणी धायरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी, “दादा एक पहाटेचा दौरा धायरीच्या डीपी रोडला पण होऊन जाऊ द्या की. दादा तुम्ही आल्यानंतरच धायरीचा डीपी रोड होणार आहे.” अशा आशयाचे बॅनर लावले आहेत.

धायरी परिसरातील वाहतूक कोंडी, अपुऱ्या रस्त्यांची अवस्था आणि वाढती लोकसंख्या यामुळे डीपी रोडचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासन तसेच संबंधित लोकप्रतिनिधींना त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. धायरी गावाचा डीपी रोड प्रत्यक्षात आल्याशिवाय नागरिक शांत बसणार नाहीत असा इशारा समस्त ग्रामस्थ धायरी गाव
धायरी गाव डीपी रोड वेल्फेअर ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात आला आहे.

See also  मतदान वाढविण्याची घेतली शपथ