पुणे: बालगंधर्व परिवार ट्रस्ट, महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने पाककला स्पर्धा आणि सभासदांना अपघाती विमा पॉलिसी वाटप चा कार्यक्रम पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र,पुणे येथे संपन्न झाला.
यावेळी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपट निर्माते अमित पोतदार,पाककला स्पर्धेचे परीक्षक किशोर सरपोतदार,मास्टर शेफ सर्वेश जाधव,भारती मेढी,अलविरा मोशन पिक्चर्स च्या दिपाली कांबळे, पुणे म. न. पा. चे चव्हाण, परिवाराचे कार्यकारिणी सदस्य अरुण गायकवाड,विनोद धोकटे,विनायक कडवळे, हरीश गुळीग,शंकर घोडेराव,मिटठू पवार, उमेश मोडक उपस्थित होते.
या प्रसंगी प्रास्ताविक अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केले.तसेच परिवाराचे सचिव चित्रसेन भवार आणि परिवारातील महिला कार्यकारिणी सदस्य वर्षा संगमनेरकर,वनमाला बागूल,शिल्पा भवार,स्वाती धोकटे, हेमा कोरभरी,मृणाल लोणकर यांनी श्रावण सोहळा या कार्यक्रमात गीत आणि नृत्याने धमाल केली.
पाककला स्पर्धेच्या विजेत्या महिला उल्का ओझरकर, वर्षा दाभाडे,सीमा नलावडे,मनीषा भावे, सोनाली पाटे,विद्या ताम्हणकर यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात प्रतिनिधिक स्वरूपात ज्येष्ठ कलावंताना विमा पॉलिसी चे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी परिवाराचे खजिनदार अनिल गुंजाळ आणि कार्यकारिणी सदस्य योगेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच सूत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य शोभा कुलकर्णी यांनी केले तर परिवाराचे उपाध्यक्ष पराग चौधरी यांनी आभार मानले.