पुणे : गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. आर .एस .धारीवाला फाउंडेशन व घोलप रक्त पेढी यांच्यातर्फे फिरते रक्तदान केंद्र भरवले. या उपक्रमात प्राचार्य डॉ.प्रा .संजय खरात सर व शिक्षक तसेच विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले या उपक्रमाचे संयोजन एन एस एस विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.कुमोद सपकाळ सर यांनी केले.या शिबिरात १०६ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले , २६६ विद्यार्थी हिमोग्लोबिन चेक केले.
प्राचार्यांनी मार्गदर्शन रक्तदान साठा वाढवणे आणि जनजागृती करणे, रक्त साठ्यात वाढ करून आपत्तीच्या काळात गरजूंपर्यंत वेळेत रक्त पोहोचवणे हे प्रमुख उपक्रमामागील उद्दिष्ट होते.
शिबिरात येणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे वैयक्तिक तपासणी हिमोग्लोबिन चाचणी केली जात होती रक्तदानानंतर प्रमाणपत्र व अल्पपोहार देण्यात आला. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर रोहिदास घोलप यांनी मदत केली. शिबिरात डॉ. गोविंद कांबळे व डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यर्थ्यांनी उपस्थित राहून विशेष सहकार्य केले. सर्व शाखेच्या उपप्राचार्य या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रा. शामकांत देशमुख,कार्यवाह, पी ई सोसायटी, डाॅ जोत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह, पी ई सोसायटी यांनी अभिनंदन केले.